राजकारणापलीकडे मैत्री जपणारा नेता म्हणजे गौरव खरात :- विरोधी पक्षनेते अमोलबापु शिंदे
मोहोळ तालुक्यातील येणकी सारख्या एकाद्या छोट्याश्या गावातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर राजकारणात एका सामान्य कार्यकर्त्यापासून मोहोळ युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मोहोळ विधानसभा कॉंग्रेसचे उमेदवार, सोलापूर जिल्हा अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष, पदापर्यंत मजल मारून राज्य पातळीवरील अनेक नेत्यांशी जवळकीचे संबंध निर्माण करून जनतेचे प्रश्न सोडविणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांचे निष्ठावंत बुद्धीवासी गौरव खरात तसेच मैत्रीला जागून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे बु. सौरभ तुळसे, बु. सिद्धार्थ उर्फ मलिक राजगुरू, बु. मयूर कदम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या व गौरव खरात मित्रमंडळी यांच्या वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेकांनी त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य, कामाची पद्धत, मैत्रीसंबंध याबद्दल आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणी जाग्या केल्या.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, युवक कॉंग्रेस अध्यक्ष आंबदास बाबा करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, जेष्ठ नेते राजेश अप्पा पवार, मधुकर आठवले, अशोक कलशेट्टी, भिमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, वाहिद बिजापुरे, योगेश मार्गम, विवेक कन्ना, महेश जोकारे, महेश लोंढे, अर्जुन साळवे, प्रवीण जाधव, अमोल भोसले, राजासाब शेख, सिद्राम सलवदे, युवराज जाधव, सागर शहा, राज सलगर, नागनाथ कदम, गोविंद कांबळे, प्रमिला तुपलवंडे, अंजलीताई मंगोडेकर, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, यल्लाप्पा तुपदोळकर, कुणाल गायकवाड, शाहू सलगर, नूर अहमद नालवार, अजिंक्य गायकवाड, रामसिंग आंबेवाले, श्रीकांत दासरी, रोहित भोसले, निखील पवार, अमित राठोड, विश्वनाथ दुर्लेकर, नागेश म्याकल, अरुणा बेजरपे, लॅबा मागाडे, यांच्यासह इतर गौरव खरात मित्रमंडळी उपस्थित होते.