गोरगरीब व्यापाऱ्यांच्या गाई चोरीस गेल्याची फिर्याद देण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याची कोणी घेईना दखल! लवकरात लवकर गरीब व्यापाऱ्याला न्याय देऊन अज्ञात चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार:- सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सदर हकीकत अशी आहे की बार्शी शहरातील, वाडा घर क्रमांक ४२०७, सोमवार पेठ येथे राहणारे मेहबूब हमीद बागवान, मुस्लिम समाजाचे असून यांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या देवणी जातीच्या दोन गाई शेंडगे स्टीलच्या पाठीमागे भोगेश्वरी मंदिराच्या समोर, बांधलेल्या असताना सदर दिनांक:-२४/१२/२०२२, रोजी रात्र ठीक दहा वाजता गाईंना चारापाणी करून माघारी गेलो होतो व दिनांक २५/१२/२०२२, रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गायींना चारापाणी गेली देण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी त्या गाई दिसून आल्या नाहीत त्या देवणी जातीच्या दोन गाई दिनांक २४ ला, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचे निदर्शनात आल्यानंतर आम्ही त्या सर्व गाईंची सर्व ठिकाणी शोधा शोध घेतली. सर्व शहरातील सर्व ठिकाणी व कत्तलखान्यांमध्ये जाऊन स्वतः मी पाहणी केली व गाईंचा शोध घेतला व फिर्यादीच्या भावांना स्वतः फिर्यादीने फोन करून सदर सर्व घटनेची माहिती सांगितली.
या सदर गाई सर्व ठिकाणी शोधले असता मिळाल्या नसल्यामुळे आम्ही माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इब्राहिम शेख यांना सोबत घेऊन बार्शी शहर पोलीस स्टेशन गाठले पण सदर ठिकाणी नेहमीप्रमाणे पोलीस स्थानकाच्या पोलीस अंमलदारांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. अशी माहिती, फिर्यादी फिर्यादीच्या मित्राकडून आमच्या प्रतिनिधी सांगण्यात आली याबाबत फिर्यादीने स्वतः माहिती दिल्याप्रमाणे सदर देवणी जातीच्या दोन गाईंचा शोध लवकरात लवकर बार्शी शहर पोलीस ठाण्याने घ्यावा व त्या दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत व गोरगरीब व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here