गोकुळच्या सभेसाठी जय्यत तयारी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गोकुळच्या सभेसाठी जय्यत तयारी!

गेल्या काही दिवसांपासून गोकुळचे(Gokul) वातावरण चांगले ढवळून निघाले आहे.

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. नोंदणी झालेल्या नवीन 450 संस्था त्यावरून सुरु झालेले आरोप प्रत्यारोप या सभेतील कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. गोकुळमधील सत्तांतर आणि गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच होत असलेली सभा, या कालावधीमध्ये झालेले आरोप यामुळे उद्याची गोकुळची सभा वादळी होणार यात शंका नाही. कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये गोकुळची सभा होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून गोकुळच्या सभेवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती केली जात आहे. हे राजकीय आरोप सुरु असतानाच दहीहंडीपासून रामायण महाभारत सुद्धा आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी प्रश्नांचा भडिमार केला जाणार आहे. महाडिक गटाकडून खासदार धनंजय महाडिकही सभेसाठी हजर असणार आहेत.

पोलिसांकडून सभेसाठी जय्यत तयारी, कडेकोट बंदोबस्त

गोकुळच्या सभेची पार्श्वभूमी आणि आजवरचा इतिहास लक्षात घेता कोल्हापूर पोलिसांकडूनही या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनने सभा अत्यंत गांभीर्याने घेत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केलं आहे. महासैनिक दरबारमध्ये होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पार्किंगला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हॉल समोरील रस्त्यांवरील वाहने लावता येणार नाहीत. या संदर्भात पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

शेवटच्या सभासदाचे समाधान होत नाही तोपर्यंत उत्तरे दिली जातील

विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी आघाड्यांकडून एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर आमदार आणि सत्ताधारी आघाडीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Gokul) यांनी विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील, कोणत्याही प्रकारे सभा गुंडाळली जाणार नाही, शेवटच्या सभासदाचे जोर समाधान होत नाही तोपर्यंत सभा सुरु ठेवली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

विरोधकांकडूनही प्रश्नांची सरबत्ती होणार

गोकुळच्या संचालिका शौमिका मडाडिक यांनी सातत्याने विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांमध्ये 450 संस्था वाढल्या आहेत, मात्र संकलनात वाढ झालेली नाही. भविष्यातील निवडणुकांसाठी संस्थांची नोंदणी झपाट्याने सुरू झाली आहे. ज्या संस्था वाढल्या त्यामधून संकलन किती वाढले याचेही उत्तर दिले पाहिजे, नोंदणी केलेल्या संस्था कोणाच्या आहेत याची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना दुधाचा दर्जा घसरल्याचे म्हटले आहे.

धनंजय महाडिकांडून सतेज पाटील लक्ष्य!

दहीहंडी कार्यक्रमापासून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik on Gokul) आणि सतेज पाटील (Satej Patil in Gokul) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गोकुळ सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांना लक्ष्य केले. गोकुळची वाटचाल शेतकरी संघाकडे होत चालल्याचा आरोप त्यांनी केला. वाढलेल्या 450 संस्था केवळ दप्तरी असून सत्ताधाऱ्यांनी असे करू नये, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.

हजारो कोटींची उलाढाल असलेला गोकुळ (how much Gokul Turnover)

‘गोकुळ’ या ब्रँड नावाने प्रसिद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. हा ‘ऑपरेशन फ्लड’ योजने अंतर्गत स्थापन झालेला जिल्हा सहकारी दूध संघ आहे. गोकुळची स्थापना 16 मार्च 1963 रोजी झाली आहे. त्यानंतर दुधाचे संकलन, विस्तार, पशु आरोग्य, पशु प्रजनन, दूध प्रक्रिया आणि उत्पादन तसेच विपणनाच्या क्षेत्रात अनेक मोठे टप्पे गोकुळने पार केले आहेत. आज ‘गोकुळ’ कडे कोल्हापूर येथे 7 लाख लिटर क्षमतेचा अत्याधोनिक डेअरी प्लँट असून स्वतःची 5 शीतकरण केंद्रे आहेत. त्यांची हाताळणी क्षमता 5.25 लाख लिटर इतकी आहे. वाशी मुंबई येथे संघाचे स्वत:चे अत्याधुनिक पॅकिंग स्टेशन आहे.

दूध उत्पादन वाढ व जनावरांचे आरोग्य सुधारणेसाठी, संघाकडे सध्या 43 फिरते पशु वैद्यकिय मार्ग, 430 क्लस्टर्स आणि 17 स्थायी कृतीम रेतन केंद्रे आहेत. संघाचा ‘महालक्ष्मी’ या ब्रँडखाली दररोज 200 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा स्वतःचा पशुखाद्य प्रकल्प आहे. तसेच दररोज 300 मेट्रिक टन क्षमतेचा (500 मेट्रिक टन विस्तारक्षम) असलेला नविन पशुखाद्य प्रकल्प कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये कार्यान्वित करणेत आला आहे. गोकुळची (Gokul Turnover) 2021/22 या वर्षातील एकूण 2 हजार 229 कोटी असून सत्तांतर झाल्यानंतर गोकुळच्या नफ्यात 400 कोटींनी वाढ झाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here