गेली सात दिवसापासून सासुरवाडी तुन बेपत्ता झालेली गरोदर महिलेचा थाग पत्ता लागेना (माहेर च्या मंडळी च्या मनात संशयाचे काहूर) (अखेर पोलिसात तक्रार दाखल)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नांदेड जिल्यातील नायगावं तालुक्या मधील पीपळगांव येथील गरोदर महिला दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी सासरच्या राहत्या घरातुन निघुन गेलेली ५ महिन्याची गरदोर महिला अजुनही बेपत्ता नायगाव पोलिस स्टेशन मध्ये हरवलेल्या महिलेची केली नोंद
पदमा नागेश सुर्यवंशी हि महिला सासरच्या राहत्या घरातुन रात्री ११ वाजता कुणालाच न सांगता घरातुन निघून गेली आहे.सविस्तर माहिती असी की या महिलेचा विवाह ४ मे २०२२ रोजी नागेश जिवन सुर्यवंशी राहणार पिपळगांव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांच्याशी झाला होता ते दोघे मुंबई येथे कामासाठी राहत होते.पदमा हि पाच महिन्याची प्रेगनेट होती संसारात त्या दोघांची आपआपसात भांडणे होत होती त्या मुळे नागेश यांनी आपल्या पत्नी पदमा हिला आपल्या गावी पिपळगाव या ठिकाणी आपल्या आई- वडीलाजवळ ठेऊन परत कामासाठी मुंबईला आला पदमा ही आपल्या सासरी काही दिवस सासरी सर्वा सोबत राहीली ईथे पण पदमा सोबत सासरच्या मंडळी कडुन भांडणं चालु झाली .पदमा ने या दिवशी घरी एकटीच होती सासुबाई दुसऱ्या गावी गेलेली होती सासरे शेतावर झोपण्यासाठी गेले व दिर हा घराच्या छतावर झोपलेला होता.रात्री दोन वाजता दीर हा पाणी पिण्यासाठी छतावरुन खाली घरात आला तर त्या वेळी पदमा हि घरात नव्हती त्या वेळी अजुबाजुला चौकशी केली असता काही पत्ता लागत नसल्यामुळे त्यांनी पदमाचे पती नागेश सुर्यवंशी व नातेवाईक माहेरी फोनवरून घडलेली घटना सांगितले पदमा चे माहेर हे मुखेड तालुक्यातील लादगा येथील आहे पदमाचे आई व वडील दोघेही वारलेले आहेत पदमा ही कैलास वाशी सटवा शेषेराव नरगुंडे ची मुलगी आहे .पदमाची सावत्र आई रमाबाई सटवा नरगुटे आहे ,व चुलते उद्धव शेषेराव नरगुडे,चांदु शेषेराव नरगुडे,विठ्ठल शेषेराव नरगुडे , मोठी बहीन,आत्या,सर्व नातेवाईक आसा पदमाचा माहेर चा परिवार आहे हि घटना कळाल्या नंतर नातेवाईक यांनी नायगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी हरवलेले व्यक्ती ची नोंद केली आहे आतापर्यंत पदमाचा पत्ता लागला नसल्यामुळे व पदमा ही प्रेगनेट आसल्यामुळे नातेवाईक काळजी करत आहेत
जर हि हरवालेली महिला कुठे आढळुळ आल्यास खालील नंबर वर संपर्क करा.१)उद्धव नरगुडे लादगा – 9970943275
२) विठ्ठल नरगुडे लादगा – 8454974761
३)नागेश सुर्यवंशी पिपळगाव – 8698567682

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here