गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर विठूभक्तांना मिळणार श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. यानंतर मुखदर्शन सुरू करण्यात आले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली होती. मंदिर समितीने देखील राज्य सरकारकडे पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा ठराव करून पाठवला होता. अखेर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर देवाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी केली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह सदस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली या बैठकीत पदस्पर्श दर्शनाला शासनाने परवानगी दिली आहे.
मार्च 2020 मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मुखदर्शन सुरू करण्यात आले होते.
मात्र आता कोरोनाचा कहर संपला असल्याने पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह वारकरी संघटनांनी केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर समितीने देखील पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा ठराव केला होता. अखेर मंगळवारच्या बैठकीत पदस्पर्श दर्शन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाविकांच्या भावनांसह मंदिर परिसरात हार- फुले, नारळ , कुंकू , बुक्का विकणाऱ्या व्यवसायिकांनाचा विचार करून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर मनसेच्या मागणीला यश आले. या निर्णयाचे मनसेने पेढे वाटून स्वागत केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here