खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे शेतकऱ्यांची जीवनमान उंचावून विकासाला चालना दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन – राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर. माळशिरस तालुक्यासाठी ऐतिहासिक निर्णय फलटण-पंढरपूर रेल्वे व निरा-देवधर प्रकल्पातील कॅनॉलसाठी निधी मंजूर केलेला आहे.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेले कॅनॉल व माळशिरस तालुक्याच्या विकासाला व दळणवळणाला चालना देणारा फलटण-पंढरपूर रेल्वे या दोन्ही प्रकल्पाला कोट्यावधी रुपयाचा निधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून मंजूर करून घेतल्याबद्दल सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन केलेले आहे.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे इंग्रज कालीन १९०८ साली मंजूर असलेला लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर फलटणपर्यंत पूर्ण झालेला होता. फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी ९२१ कोटी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतले आणि रखडलेल्या नीरा-देवधर प्रकल्पाच्या कॅनॉलसाठी ३९७६ कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करून घेतलेले असल्याने माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील निरा-देवधर प्रकल्पामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. तर फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गामुळे विकासाला गती येऊन व्यापारी व सर्वसामान्य शेतकरी यांच्या शेतीमालाची निर्यात, आयात करण्यासाठी मोठा उपयोग होणार असून माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनता या कामगिरीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळात मंजुरी देऊन फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी केंद्राच्या बजेटमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बजेटमध्ये समाविष्ट केल्याने दोन्हीही प्रश्न खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून मार्गी लागलेले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पक्ष कोणताही असो पक्षापेक्षा महत्त्वाचे काम करणाऱ्या माणसाचे कौतुक केले पाहिजे. अनेक लोकांचे जीवनमान उंचावणार आहे. यापूर्वीच्या खासदारांनी हायमास्ट दिवे व एसटी, पिकप शेड उभा करून कार्यकर्ता जोपासण्याकरता योजना राबविलेल्या आहेत. त्यापैकी सध्या अनेक हायमास्ट दिवे बंद पडले आहेत तर, कितीतरी पिकअप शेड धूळ खात पडलेले आहेत. आजपर्यंतच्या खासदारांमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे काम सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे आहे. खासदार आणि आमचा पक्ष वेगळा असला तरीसुद्धा केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव केला पाहिजे. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागामध्ये वंचित राहिलेल्या विकासाला चालना मिळणार आहे. प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचा विकास केलेला नाही. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पश्चिम भागाला न्याय मिळालेला असून रेल्वेमुळे संपूर्ण राज्याला व राज्याबाहेर असणाऱ्या भाविक भक्तांना व उद्योग व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी बांधव यांना फायदा होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here