खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली, गारपीटग्रस्त भागांची पाहणी! (नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यासाठी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली, गारपीटग्रस्त भागांची पाहणी!

(नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यासाठी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना)

माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या माळशिरस तालुक्यातील मौजे दहिगाव,मांडवे आदी परिसरातील दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी केली..दोन दिवसांपूर्वी या भागात मोठा पाऊस झाला होता. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान यामुळे झाले होते.

दहिगाव मांडवे आदी परिसरातील वादळीवाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता.
यावेळी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत अनेकजण उपस्थित होते..

चौकट

या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या शेतमालांचेही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.. माझ्याकडुन होईल तेवढी मदत करण्यात येणार असून शासकीय स्तरावर काही मदत मिळते का हे सुद्धा मी पाहत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत मदत करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here