खा. धनंजय महाडिक व मा.खा.राजू शेट्टी यांच्यामध्ये बंद दाराआड खलबते

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खा. धनंजय महाडिक व मा.खा.राजू शेट्टी यांच्यामध्ये बंद दाराआड खलबते

 

कोल्हापूर // प्रतिनिधी

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी माजी खासदार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी यांच्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून खलबते झाल्याचे समजते.
सर्व दुकाने सुरू; तरीही रुग्णसंख्येत वाढ नाही
महाविकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून जुळवाजुळवीचे राजकारण सुरू असले तरी, प्रत्यक्ष या निवडीला गोकुळच्या निवडणुकीतील राजकारणाचा वास येत आहे.

गोकुळचा वचपा काढण्यासाठी विविध गटाचे एकत्रीकरण करून शह देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळातही 16 हजार पासपोर्ट मंजूर
जिल्हा परिषदमध्ये 67 इतकी सदस्य संख्या आहे. यामध्ये अब्दुललाट (ता. शिरोळ) मतदारसंघातील सदस्य विजय भोजे यांना जातवैधता प्रमाणपत्र न्यायालयीन प्रक्रिमुळे मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे अध्यक्षपद निवडीसाठी 33 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. महाडिक व शेट्टी यांच्या बैठकीवेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जि. प. सदस्य दलितमित्र अशोकराव माने व राजवर्धन नाईक-निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, बजरंग खामकर, शीतल गतारे उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट होतोय कमी : डॉ. कादंबरी बलकवडे
स्वाभिमानीशी जुळवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी भाजपाशी गेली दोन वर्षे फारकत घेतली आहे. पण भाजपच्या जिल्हा नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीत याचे पडसाद दिसून येणार आहेत. गुरुवारी त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याचे समजून येत असून मंत्री यड्रावकर विरोधी सर्व गट एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here