खासदार नारायण राणे झाले ‘केंद्रीय मंत्री’

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खासदार नारायण राणे झाले ‘केंद्रीय मंत्री’

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल, या चर्चेला आता पुर्विराम मिळाला आहे. नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ४ नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. आज ४३ मंत्री शपथ घेतील, त्यात ३६ नवीन मंत्री आणि सात जुन्या मंत्र्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मंत्री बनण्यासाठी जाणारे सर्व नेते राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये उपस्थित आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांचे नावे चर्चेत होते. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी सुरू होत्या. शपथविधीची वेळ जवळ येत असतानाच कुणाला मंत्रिमंडळात घेणार याविषयी राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली होती. मात्र, अखेर यावरील पडदा दूर झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चार जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.

नारायन राणे यांना मोदी सरकारने पहिल्या रांगेत स्थान दिले. राणे यांनी हिंदी भाषेतून मंत्रीपदाची शपथ घेतली. आता राणे यांच्याकडे कोणते खाते देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे ६ वेळा आमदार राहिले आहेत. राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थक जल्लोष करत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here