खाजगी साखर कारखानदारीला सहकाराची स्पर्धा हवीच अन्यथा शेतकऱ्याची पिळवणूक -प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,विलासराव देशमुख तसेच खा. शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचे जाळे तयार झाले. ऊस या नगदी पिकाचे क्षेत्र वाढले.शेतकऱ्यांची उन्नती झाली.मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली.परंतु अलीकडे सहकाराला खाजगी साखर कारखानदारीचे ग्रहण लागले.”प्रायव्हेट लि. शुगर फॅक्टरी” चे पिक आले.दगड मारेल तिथे खाजगी साखर कारखाना उभा राहिला.शेकडोंच्या संख्येने देशात स्वमालकीचे खाजगी साखर कारखाने उभे झाले.परिणामी सहकारी कार खान्याच्या कार्य क्षेत्रातील शेलका ऊस खाजगी कारखान्याने “ऊस पळविण्याची शर्यत”सुरू झाली. विनाकारण वाढलेला वाहतुकखर्च शेतकऱ्याच्या माथी मारला मारला जाऊ लागला.सहकारी साखर कारखाने चालवून त्यामधून मिळ्णार्या पैशाची चटक लागल्यामुळे आर्थिक दृष्ट्या बलाढ्य झालेल्या सर्वच आमदार- खासदारांना खाजगी साखर कारखानदारीचे डोहाळे लागले.एका एका पुढाऱ्याचे पाच- पाच सहा-सहा कारखाने ऊभे झाले. शेतकर्यांचा जाणता राजा शरद पवार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून रिलायन्सच्या साखर उद्योगात ऊतरण्या पासून अंबानींना थांबवलं होतं.परंतु शेतकऱ्यांनी निवडून दिलेले आमदार खासदार आज शेतकऱ्यांच्या जीवाला “अंबानी”होऊन बसले.सहकाराची सोनेरी चळवळ सर्वांनी मिळून मोडीत काढत स्वार्थाची अभद्र एकी केली. खाजगी साखर कारखानदारांना सोन्याचे दिवस आले. मात्र ऊसाचा शेतकरी मात्र कफल्लक झाला. त्याचे भविष्य अंधारमय झाले.ऊस उत्पादक शेतकरी खाजगी साखर कारखानदारांकडून नागविला,चालला लुटला चालला. शेतकरी संरक्षणासाठी एफआरपी चा कायदा आला.परंतु कायदा धाब्यावर बसवून “काटा मारी” ऊस “बिल बुडवणे” अथवा “कमी देणे” किंवा ते “उशिरा देणे” ह्या पळवाटांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची लूट होऊ लागली.मतदार संघातील पकड मजबूत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला वेठीला धरले जाऊ लागले. सहकाराची जाण असलेले शरद पवार खाजगी साखर कारखानदारीच्या विरोधातच होते. “शेतकऱ्यांच्या जाणत्या राजाने” खाजगी साखर कारखानदारीमुळे शेतकऱ्यांची भविष्यात अडवणूक पिळवणूक होऊ शकते हे जाणले होते. म्हणूनच रिलायन्स सारख्या मक्तेदार होऊ पाहणाऱ्या मोठ्या उद्योग समुहाला साखर उद्योगात उतरण्यापासून त्यांनी रोखले होते.पवार साहेबां सारखा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवून जर प्रत्येक आमदार खासदारांनी काम केलं असतं तर ही सहकार चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायापालट झाला असता.त्याची मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकली असती,ती चांगल्या घरात राहू शकली असती, अंगावर चांगलं घालू शकली,असती चांगलं खाऊ शकली असती, भयमुक्त चिंतामुक्त जीवन जगू शकली असती!असे भावनाविवश उदगार सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी भीमा कारखाना येथे आमच्याशी बोलताना काढले.

मोहोळ तालुक्यात भीमा एकमेव सहकारी कारखाना

मोहोळ तालुक्यात भीमा हा एकमेव सहकारी साखर कारखाना असून त्याला शेजारील लोकनेते शुगर प्रा.लि. अनगर,जकराया शुगर आष्टी येथील पाटील शुगर,युटोपियन शुगर, भैरवनाथ शुगर, इ. कारखान्यांशी स्पर्धा करावी लागते.भीमा हा सभासदांच्या मालकीचा सहकारी कारखाना अडचणीत असतानासुद्धा तो टिकला पाहिजे व सहकार वाढला पाहिजे केवळ या भावनेपोटी एकजुटीने पाच लाख टन ऊस भीमा कारखान्याला गाळपास देऊन चेअरमन धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
प्रा.संग्रामदादा चव्हाण
संघटक समन्वयक, भीमा परिवार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here