खाजगी शालेय आस्थापना कडुन फी वसुलीसाठी अनुचित प्रकार होत असल्याबाबत सरकारचे वेधले लक्ष :आमदार समाधान आवताडे. एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आदर्शाचे उदाहरण -.आमदार समाधान दादा आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३, आज आपले संवेदनशील आमदार समाधान आवताडे यांनी एक महत्वपुर्ण तसेच खाजगी शालेय शिक्षण पद्धतीमधे फी संदर्भात होत असणारे गैरप्रकार,गैरवागणूक तसेच विद्यार्थ्यांसोबत चालू असणाऱ्या या अनुचित प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित करून संबंधित शिक्षण खाते मंत्रीमहोदयांसोबतच सरकार तसेच प्रशासन व पालक वर्गाचे ही लक्ष वेधले.

वाघोली ,पुणे येथील मॅक्सीकॅान इंटरनॅशनल स्कूल येथे शैक्षणिक फी भरली नसले कारणाने जो विद्यार्थ्यांसोबत डांबून ठेवण्यासारखा जो गंभीर व अनुचित प्रकार घडला त्यासंदर्भात स्पेसिफीक प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे तसेच या व्यवस्थेचे लक्ष वेधत पालक वर्गाची बाजू मांडत सभागृहाला ,शासनाला या फी वसूली संदर्भात घडत असलेल्या अनुचित गैर तसेच गंभीर प्रश्नाबाबत दखल घेऊन यावर कडक कारवाई करणार का?
तसेच अशा खाजगी शालेयआस्थापना ,व्यवस्था यांवर अंकुश रहावा असे अनुचित प्रकार घडू नयेत,बालमनांवर आघात होण्यासारखे प्रकारावर अंकुश ठेवण्याकरिता काय व्यवस्था ,कायदे करण्यात येतील,अशा प्रकारांवरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन जरब बसविण्यात येईल का?
यासंदर्भात प्रश्न करत आमदार .समाधान दादांनी लक्ष वेधले,यावर मंत्री महोदय दिपक केसरकर यांनी तात्काळ दखल घेत यावर समिती स्थापन करून अशा गैरप्रकारांवर कारवाईबाबात आपले आमदार समाधान दादांना आश्वस्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here