क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने टेंभुर्णी येथे महामोर्चा.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने टेंभुर्णी येथे महामोर्चा.

 

सोलापूर // प्रतिनिधी

(1)एससी एसटी वरती होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात. (2)अ) मागासवर्गीय दि. 07/05 2019 च्या शासन निर्णयानुसार रद्द केलेले 33% आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 17 5 2018 व 5/6/2018केंद्र सरकारच्या दिनांक 15 /6/ 2018 च्या आदेशाप्रमाणे मा. न्यायालयाचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीत. ब) मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून मागासवर्गीय पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या वर ॲट्रॉसिटी तसेच आरक्षण आधी नियम कलम अन्वये गुन्हा दाखल करावा. क ) मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले मागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीय यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्कासित करून मागासवर्गीय मंत्र्याची नियुक्ती करावी.( 3) मागासवर्गीय वरील जातीवादी अत्याचाराच्या केसेस चालवण्यासाठी तालुकास्तरीय न्यायालय निर्माण करावे.( 4 ) मंत्रिगट समितीच्या 2006 चा शिफारशीप्रमाणे ओबीसींना ही पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे.(5) ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मधील आरक्षणासाठी तत्काळ आयोग नेमावा.(6) पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात.(7) ईव्हीएम मशीन बंद न करणाऱ्या लोकशाहीविरोधी सरकारच्या विरोधात.(7) शेतकरी व घरगुती वीज बिल माफ न करणाऱ्या सरकार विरोधात.(8) ओबीसीची जातिनिहाय जनगणना करणाऱ्या जातीवादी सरकारच्या विरोधात. हा मोर्चा बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, तरी बहुजन समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान, जिल्हाध्यक्ष गणेश देवकते यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here