को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालक पदी डॉ. यशवंत कुलकर्णी यांची बिनविरोध निवड
(डॉ. कुलकर्णी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव)
श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या भारतातील को जनरेशन प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोशियन वर दुसऱ्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ व कामगार युनियनने त्यांना शुभेच्छा दिल्या को- जनरेशन असोशियन चे अध्यक्ष शरद पवार असून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर उपाध्यक्ष आहेत. डॉ यशवंत कुलकर्णी हे पांडुरंग कारखान्यात 10 वर्षापासून एमडी असून या कालावधीत त्यांनी कमीत कमी वाफेचा वापर करून अधिकची वीज निर्मिती केल्याने पांडुरंग कारखान्याचा राष्ट्रीय गौरव झाला.