कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांचे अर्थसहाय्य साठी अर्ज भरून घेण्यासाठी तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

जिल्हा प्रशासनामार्फत 25 व 26 डिसेंबर 2021 रोजी प्रत्येक तालुका मुख्यालयी शिबीर होणार

 

सोलापूर, दि.24 (जिमाका) :- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक 11/09/2021 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविड-19 या आजाराने निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रूपये 50,000/- (रू.पन्नास हजार ) इतकी मदतनिधी वितरीत करणेकामी शासनाने मान्यता दिली आहे. सदरचे अर्थसहाय्य मिळणेकरिता कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकाने राज्य शासनाने विकसित केलेल्या http://mahacovid19relief.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्ज भरून घेणेकामी दिनांक 25 व 26 डिसेंबर 2021 रोजी खालील कागदपत्रासह तालुकानिहाय निश्चित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून अर्ज भरावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

कागदपत्रे :- 1.अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, 2. अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील,3. मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, 4. मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र, 5. इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र, 6. मृत प्रमाणपत्र नसेल तर वैदयकीय अधिकारी यांनी दिलेले Cause Of Death प्रमाणपत्र , 7. ICMR नंबर ऑनलाईन अॅपलिकेशनमध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

तालुका निहाय कॅम्पच्या ठिकाणांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. 1.उत्तर सोलापूर – तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर, 2. बार्शी – तहसिल कार्यालय बार्शी व मंडळ अधिकारी कार्यालय वैराग, 3. दक्षिण सोलापूर – तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर व अप्पर तहसिल मंद्रुप, 4.अक्कलकोट – जुने तहसिल कार्यालय अक्कलकोट, 5. माढा – तहसिल कार्यालय माढा, मंडळअधिकारी कार्यालय कुडूवाडी / टेंभुर्णी / मोडनिंब, 6. करमाळा – तहसिल कार्यालय करमाळा व मंडळाधिकारी कार्यालय जेऊर, 7. पंढरपूर – तहसिल कार्यालय पंढरपूर व मंडळ अधिकारी कार्यालय, कासेगांव / करकंब / भाळवणी, 8. माहोळ – तहसिल कार्यालय, मोहोळ, 9. मंगळवेढा – तहसिल कार्यालय, मंगळवेढा, 10. सांगोला- तहसिल कार्यालय,सांगोला, 11. माळशिरस – तहसिल कार्यालय, माळशिरस व मंडळ अधिकारी कार्यालय अकलूज/ नातेपुते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here