कोल्हापूर दक्षिण 19 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

कोल्हापूर येथील दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवार दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठिक 10 वाजता कोल्हापूर ग्रामीण भागातील दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मा. खासदार. धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष मा. राजे समरजितसिंह घाटगे,मा.आ.अमल महाडिक,विद्यमान गोकुळ संचालिका सौ.शौमिक अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती मिळते आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून दक्षिण मतदारसंघाच्या गौरवशाली भविष्याचे शिलेदार व साक्षीदार बनण्यासाठी आवाहन केले आहे. सदर मेळावा हा सोसायटी नं 5 हॉल, आर के नगर, मोरेवाडी, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी कोणत्याही आफवांना बळी न पडता विहित तारखेला विहित ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होवून मिशन २०२४ साठी सज्ज व्हावे व अधिक माहितीसाठी कोल्हापूर भाजपाच्या वतीने आव्हानही केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here