कोल्हापूर ते बेंगलोर दैनंदिन विमानसेवा दिनांक १३ नोव्हेंबर पासून सुरू होणार:खा.धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर ते बेंगलोर दैनंदिन विमानसेवा दिनांक १३ नोव्हेंबर पासून सुरू होणार:खा.धनंजय महाडिक

इंडिगो एअरलाईन्स ची कोल्हापूर – बेंगलोर दैनंदिन विमानसेवा १३ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली ‌कोईमतुर पर्यंत विमान सेवेचा विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून बंद झालेली कोल्हापूर ते बेंगलोर या मार्गावरील विमान सेवा पुन्हा सुरू होत आहे. खासदार महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. विशेष म्हणजे इंडिगो एअर लाइन्सकडून आठवड्यातील सातही दिवस कोल्हापूर बेंगलोर विमान सेवा सुरू होत आहे ‌‌. याच फ्लाईटचा विस्तार कोइमतुरपर्यंत करण्यात आलाय. त्यामुळे कोल्हापूर ते कोईमतुर व्हाया बेंगलोर अशी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. १३ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या या विमान सेवेसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे खंडित झालेली कोल्हापूर बेंगलोर विमान सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here