कोल्हापूरातील विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने निधी केला वर्ग:खासदार धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर येथील विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 52 कोटी 72 लाख 57 हजार 500 रुपयांचा निधी मंजूर केला. शासनाने निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग केला. त्याबद्दलचा शासकीय अध्यादेश बुधवारी प्रसिद्ध झाला असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

या विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीची गरज आहे. विमानतळाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. ते प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच लोकहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. राज्य शासनाने विमानतळाच्या भूसंपादनासाठी 52 कोटी 72 लाख 57 हजारांचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग केला. शिंदे-फडणवीस सरकारने विमानतळाच्या विकासासाठी प्रत्यक्ष निधी दिला. उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नातून विमानतळाच्या भूसंपादनासाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here