कोरोना तिसरी लाट रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांच्या आराखडा प्रसिध्दी करा :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोरोना तिसरी लाट रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांच्या आराखडा प्रसिध्दी करा :- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोनाचा येणाऱ्या संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेले उपाय योजनांचे माहिती सर्व सामान्यापर्यंत पोहचावे यासाठी प्रसिध्दी करण्यात यावी . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा . जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा . जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा तांडव संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे . त्याच पद्धतीने आपल्या देशात , महाराष्ट्रात आणि सोलापूर शहर व जिल्ह्यात महाभयंकर अशी परिस्थिती कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली होती . त्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री . नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाने जनेतच्या सहकार्याने कोरोना पळविण्यात यशस्वी झाले . या १६ ते १७ महिन्यांमध्ये जनतेला कोरोनामुळे अत्यंत कठीण परिस्थिती सहन करावे लागले .
महाराष्ट्र शासन , विविध आरोग्य तज्ञ आणि इतर तज्ञांकडून येणाऱ्या महिना – दीड महिनांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असे विविध माध्यमातून समजते . त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांनीही प्रशासनास व जनतेस कोरोना तिसरी लाटेबाबत सावध राहून आरोग्य खात्यांनी जाहिर केलेल्या नियमांचे पालन करावे . असे जनतेला आवाहन केले आहे . वरील सर्व माहितीचा आधार घेता तिसरी लाटेला रोखण्यासाठी जनतेचे सहभाग व सहकार्य अत्यंत गरजेचे आहे .
कोरोना प्रादुर्भावाच्या सोलापूराची परिस्थिती पाहता संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना धुमाकुळ घालित असतांना सोलापुरात मात्र सुरुवातीला एकही कोरोना पेशंन्ट आढळला नाही . असे असतांना अचानकपणे एक पेशंन्ट आढळला आणि बघता – बघता शेकडो , हजारोंच्यावर कोरोना पेशंन्टची संख्या गेली . यामुळे कोरोना रोखण्यासाठी व कोरोना लागण झालेल्या रुग्णांना उपचार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागले म्हणजे बेडची कमतरता , औषधे उपलब्ध नसणे , डॉक्टरांची कमतरता अशा अनेक अडचणीमुळे अनेक रुग्ण दगावले तरीही प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आले . त्याच पद्धतीने कोरोना दुसऱ्या लाटेतही हीच परिस्थिती निर्माण झाली . म्हणजे प्राणवायु कमतरता , बेड कमी , लसची तुटवडा अशा अनेक समस्यामुळे प्रशासनाची तारंबळ उडाली यातून कसेबसे सावरले आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आली . आता येणारी तिसरी लाट रोखण्यसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी प्रशासनाला वारंवार आदेश देत आहेत की , संपूर्ण जनंतला कोरोनाशी लढण्यासाठी सहभागी करून घ्या . त्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सोलापूरातील सर्व सामाजिक संघटना , लोक प्रतिनिधी , समाजसेवक यांना समावेश करून घेऊन योग्य सुचना व जनजागृती करावी . तरच लोकांमधील भिती व शंका दूर होतील . आणि कोरोनामुक्त सोलापूर करण्यास मदत होईल .
तरी माननीयांना विनंती की , कोरोनाचा तिसरी लाट रोखण्याच्या अनुषंगाने तिसरी लाटापासून संरक्षण मिळविण्यासाठी आपण केलेल्या उपाय योजनांचे माहिती सार्वजनिक रित्या प्रसिध्दी करावे . आणि ही माहिती सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य ती उपाय योजना करावी . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले आहे .
*सदर निवेदनाचे प्रत माहितीस्तव मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मा . उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मा . आरोग्यमंत्री , मा . पालकमंत्री , मा . आयुक्त सो.म.पा. सोलापूर* यांना पाठविण्यात आले आहे .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दशरथ नंदाल , श्रीनिवास बोगा , पप्पु शेख गुरूनाथ कोळी , गणेश म्हंता , विठ्ठल कुन्हाडकर , रेखा आडकी , संध्याराणी कुन्हाडकर , अनिता बटगिरी आर्दीचा समावेश होता .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here