कोरोनाचे संकट देशातून पूर्णपणे नष्ट होऊ दे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पंढरपूर (दि.14):-  राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाला असून कोरोनाचे संकट देशातून पूर्णपणे नष्ट होऊ दे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन, शेतकरी सुखी होऊ दे, असे साकडे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी घातले. श्री. पाटील यांनी आज श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीरे समितीच्या वतीने समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते शाल व श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  धरणगाव पंचायत समितीचे सभापती सचिन पवार, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here