कै.नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन! (भागवत कथेचे दि २०रोजी, आयोजन) (हभप निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांचे‌ सुक्षाव्य किर्तन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कै.नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन!

(भागवत कथेचे दि २०रोजी, आयोजन)

(हभप निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांचे‌ सुक्षाव्य किर्तन)

कै. नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक २० मे २०२२ पासून माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने हरिनाम भागवत सप्ताहाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी या कारखान्याचे व्हाईस चेअरमन, बाळासाहेब नानासाहेब कर्णवर पाटील यांनी सत्यकाम न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.
प्रथम वर्ष असून अनेक धार्मिक कार्यक्रम प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, अध्यात्म, कृषी, पर्यावरण, शैक्षणिक, पारंपारिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी बाळासाहेब नानासाहेब कर्णवर पाटील यांनी दिली आहे.
आज पर्यंत बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या जडणघडणीमध्ये कै. नानासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याचबरोबर गावातील तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये, त्यांचे फार मोठे योगदान होते संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कै.नानासाहेब कर्णवर पाटील, आपल्या कामातून मोठा ठसा उमटविला होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here