केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणेसाहेब यांना सुडबुद्धीने अटक केल्याने जाहीर निषेध!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणेसाहेब यांना सुडबुद्धीने अटक केल्याने जाहीर निषेध!

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणेसाहेब यांना राज्य सरकारने अटक केली असून सदर अटक ही राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे. भाजपाच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे अगोदरच दोन ते तीन दिवस जनादेश यात्रेच्या विरुद्ध मुंबई मध्ये ४० च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले. याचाच पुढचा सुडाचा अध्याय म्हणून कायद्याला धाब्यावर बसवून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे ही अटक करण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करणारे निवेदन मोहोळ तालुका व शहर, भाजपातर्फे प्रभारी तहसीलदार मा. राजशेखर लिंबारे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. राजकुमार डुनगे साहेब यांना दिले.

या झालेल्या घटनेचा मोहोळ तालुका व शहर भाजपा च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. यावेळी लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर, भाजपा नेते शंकरराव वाघमारे, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सरचिटणीस सतीश पाटील, महेश सोवनी, मुजीब मुजावर,शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर, शहर उपाध्यक्ष नावनाथ गाढवे, सरचिटणीस विशाल डोंगरे,ता. उपाध्यक्ष सागर लेंगरे, माजी शहराध्यक्ष अविनाश पांढरे, दिनेश गडदे, सुनील गाढवे, सोमनाथ व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here