केंद्रीय पुरात्त्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या रखरखावाविषयी  विधीमंडळात अहवाल सादर करावा उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्रातील एकवीरा देवी मंद‍िर, लेण्याद्री मंद‍िरासोबतच अन्य ऐतिहास‍िक  धार्मिक स्थळे, जी केंद्रीय पुरात्त्व विभाागाच्या नियंत्रणात येतात त्यावर झालेल्या रखरखावाच्या खर्चाच्याविषयी अहवाल विधीमंडळाच्या पटलावर पुरात्त्व विभागाने सादर करावा, याबाबतचे  निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती विधान परिषदच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी  आज  महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

            डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, राज्यातील जी  ऐतिहास‍िक स्थळे, मंदिरे, स्मारके  केंद्रीय पुरात्त्व विभागाच्या नियंत्रणात येतात. ईच्छा असून देखील राज्यातील जनतेला तसेच राज्यशासनाला अशा स्थळांचे नव‍िनीकरण, सौंदर्यीकरण, डागडूजी करता येत नाही. तसेच पुरात्त्व विभागाकडूनही अनेक वर्षांपासून डागडूजी होत  नसल्याची शंका डॉ. गोऱ्हे यांनी  व्यक्त केली. त्यामुळे अशा स्थळांची अधिकच दुरावस्था होत चाललेली आहे.  केंद्रीय पुरात्त्व विभागातंर्गत येणा-या राज्यातील स्थळांमध्ये काय काम केले आहे याविषयी केंद्रीय पुरात्त्व विभागाने विधीमंडळात अहवाल सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.  लोकसभा अध्यक्ष हे संबंधित विभागाला निर्देशित करतील अशी, अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.       

महाराष्ट्राशी निगड‍ित असणा-या धार्मिक व ऐतिहास‍िक ठिकाणी  

भक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प 

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊल खुणा देशभर आढळतात. विशेषत्वाने मध्यप्रदेश, हर‍ियाणा, उत्तरप्रदेश याठ‍िकाणी उमटून दिसतात. अश स्थानांवर येणा-या भाविकांची तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘भक्ती निवास’ बांधण्‍याचा संकल्प उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांच्या मार्गदर्शनात पुढील काळात या कामासंबधी आखणी केली जाईल अशी, माहितीही त्यांनी योवळी दिली.

आमदार अधिक प्रभावीपणे संसदीय आयुधांचा वापर करतील

संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन महाराष्ट्रातील जवळपास 100 आमदारांसाठी करण्यात आले असून  संसदीय आयुधांचा वापर आमदार अधिक प्रभावीपणे करतील, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

  लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आमदारांसाठी 5 आणि 6 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.  

आपल्या मतदार क्षेत्रातील प्रश्न, समस्या प्रभावीपणे सदनात मांडण्यात यावे, तसेच संसदीय नियमावलीची माहितीची जाणीव व्हावी यासाठी सदरील प्रशिक्ष‍ण शिबीराचा लाभ होईल, अशी आशा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. आमदारांकडून येणा-या सूचनेवरून भविष्यात विधीमंडळात देशातील चांगल्या खासदारांचे व्याख्याने आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याहस्ते या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती डॉ गोऱ्हे,  विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

आजच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, खासदार गिरीश बापट, अरविंद सावंत, वंदना चव्हाण, सत्यपाल सिंग यांची व्याख्याने आयोजित

आहेत. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here