कृषीसखा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चा मा. रणजित (भैय्या) शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मौ मानेगाव, ता- माढा येथे काल सोमवार दिनांक 14/03/2022 रोजी सायंकाळी 6 वा. आधारभूत किंमत खरेदी योजना सन 2021- 22 नुसार महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई संलग्न श्री. विराज व सुरज पाटील यांच्या ‘कृषीसखा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ‘ च्या वतीने हरभरा खरेदीचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा सोलापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाचे नूतन चेअरमन मा.श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्री. रणजित (भैय्या) शिंदे म्हणाले, हे शासनाचा हमीभाव देणारे केंद्र असून ते आपल्या गावात सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल इतरत्र लाऺबच्या बाजारपेठेमध्ये नेण्याची गरज नाही त्याची सोय या तरुण उद्योजकांनी केली आहे. हरभरा पिकाबरोबर इतरही शेतीमालाची खरेदी करून त्याच्यावर प्रोसेस करून अनेक उत्पादने तयार करावीत व या कंपनीचा विस्तार वाढवावा. यासाठी जी मदत लागेल त्यासाठी आदरणीय दादा व मामाऺच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून तुमच्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले. सुरज पाटील यांचा आज वाढदिवस असल्याने मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
ते पुढे म्हणाले, जिल्हा दूध संघाची श्रेष्ठींनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. आदरणीय दादा चेअरमन झाले तेव्हा सुरुवातीला 25 हजार लिटर दूध संकलन होते पण तेव्हा कर्ज नव्हते आज संघावर 28 कोटी कर्ज आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा बारा महिन्याचा पगार द्यायचा राहिला आहे. अशा परिस्थिती मधून सर्वांची अपेक्षा आहे की, संघाला ऊर्जितावस्था मिळवून द्यावी. त्यासाठी संघाची वाशी येथील जागा विक्रीची परवानगी मिळालेली आहे, ती जागा विकून संघाचे कर्ज फिटेल व संघ उर्जितावस्थेत येईल. तसेच संघाचे सोलापूर शहरातील प्रधान कार्यालय केगाव येथे नेऊन कार्यालयाची जागा भाड्याने देणार आहोत. काही ठिकाणचे गोडाऊन भाड्याने देऊन तसेच काही ठिकाणी नवीन गाळे बांधून ते भाड्याने देऊन त्यामधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. दुधाला आणखीन दोन रुपयाचा भाव वाढवून दिला आहे त्यामुळे दूध संकलन वाढीस मदत होणार आहे. तसेच सोलापूर शहरांमध्ये दूध विक्रीचे बुथ आणखीन वाढवून त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त इतरही उत्पादने बनवून घेऊन दुध पंढरीच्या नावाने विक्रीस ठेवणार आहे.
ते शेवटी उसाच्या प्रश्नासंदर्भात म्हणाले, मध्यंतरी झालेल्या अवेळी व भरपूर पावसामुळे उसाचे एवरेज वाढले आहे त्यामुळे गाळपास वेळ होत आहे. असे असले तरी सर्व ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही.
यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक श्री.निळकंठ (बापू) पाटील, उल्हास (काका) राऊत (मा.उपसभापती), संदीप पाटील (संचालक विठ्ठलराव शिंदे कारखाना), खैरावचे उपसरपंच पंडित बापू पाटील, धानोरेचे अनिल काका देशमुख, सुभाष नागटिळक सर (संचालक विठ्ठलराव शिंदे कारखाना),बाळासाहेब पाटील, रामेश्वर नागटिळक, शरद नागटिळक,सिद्धेश्वर माळी, वैजनाथ व्हळगळ, हनुमंत चौधरी, तानाजी देशमुख, विजय कदम, अमर बडेकर (आर.पी.आय. तालुकाध्यक्ष), शिवशंकर गवळी (कापसेवाडी सरपंच),बापू गवळी, धनाजी देशमुख, बाबा पारडे,जयवंत पारडे , शिवाजी भोगे (मा.सरपंच मानेगाव),नाना पारडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here