काशिनाथ वाघे कोरोना योद्धा पुरस्कारने सन्मानित
सोलापूर ( प्रतिनिधी ) कोरोना या जीवघेण्या महामारी ने संपूर्ण जगावर तसेच भारत देशावर अस्मानी व सुलतानी संकट निर्माण केलं असून या कोरोना महामारी ला अटकाव व रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य यंत्रणा अविरतपणे काम करत असून या जागतिक महामारी चे प्रचंड पडसाद सोलापूर शहरात उमटले असून या रोगाचा प्रसार वाढू नये म्हूणन सोलापूर शहरात संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर पोलीस प्रशासन ने केला असून याच लॉक डाऊन काळात एम आय डी सी पोलीस ठाण्यातील कर्मचारी काशिनाथ वाघे यांनी आपला जीव धोक्यात घालून व कुटुंबाला बाजूला ठेवून राष्ट्रीय कर्तव्य म्हूणन शहरातील जनतेला कोरोना महामारी बाबत वारंवार सूचना तसेच हात साबणाने धुणे, समाज अंतर ठेवणे सॅनिटायझर चा वापर करणे अश्या पद्धतीने कोरोना बाबत जनजागृती केल्याने त्यांच्या या अमूल्य कार्याची दखल पत्रकार सुरक्षा समिती ने घेऊन पोलीस कर्मचारी काशिनाथ वाघे यांना कोरोना योद्धा म्हूणन पुरस्कार देण्यात आला
पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे यांच्या हस्ते फेटा शाल सन्मान पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर (बी एस ) तांबोळी अक्षय बबलाद हरी भिसे विवेकानंद खेत्री प्रदीप पेदापल्लीवार इस्माईल शेख रोहित घोडके प्रसाद ठक्का दत्तात्रय धनके, शब्बीर शेख युनूस अत्तार अशोक माचन डी डी पांढरे राम हुंडारे इम्तियाज अक्कलकोटकर लक्षमण गणपा चंद्रकांत गायकवाड सिद्धार्थ भडकुंबे तुषार वाघमारे सह अनेक पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते