कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना काहीही कमी पडू देणार नाही:विश्वराज महाडिक पंढरपूर तालुक्यातील ऊस संवाद परिषद यात्रे मध्ये सर्व ज्येष्ठ मंडळींचा घेतला विश्वराज महाडिक यांनी आशीर्वाद! (चिमुकल्या मुलांनाही आवरता आला नाही विश्वराज भैय्या यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भीमा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता चांगली रंगत आले असून संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भिमा परिवाराने प्रचारामध्ये आघाडी घेतली असून भीमा परिवाराचे युवा नेते विश्वराज भैय्या महाडिक यांनी आज पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव, खरसोळी, विटे तारापूर, मगरवाडी सुस्ते व तुंगत, आधी सर्व गावातील वाड्या वस्त्यावर जाऊन, सर्व सभासदांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या कारखान्याच्या संबंधित काही अडीअडचणी असतील ऊस नेण्याबाबत काही अडचणी असतील व प्रोग्रॅम बाबत एका अडचणी असतील याची समक्ष जाऊन माहिती घेतली. सर्व उपस्थित सभासद मंडळींना आपुलकीने व आपलेपणाने “तुम्हाला साखरचे कार्ड मिळाले का!”
अशी आपलेपणाने विचारपूस केली

या दौऱ्याप्रसंगी सर्वच गावातील, सभासदांनी विश्वराज महाडिक यांच्या सर्व कार्याचे तोंड भरून कौतुक केले. वाड्यावरती वाड्या वस्तीवरील लोकांनी व लहान मुलांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

यावेळी त्यांच्यासोबत पुढचे माजी सरपंच भारत नाना पाटील, तात्या मामा नागटिळक,छगन पवार,विलास चव्हाण,अनंता बापू चव्हाण, विठ्ठलचे माजी संचालक नेताजी सावंत,भीमाचे संचालक दिलीप रणदिवे, संचालक तुषार चव्हाण, आदी सभासद शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here