कार्यकारी अभियंता संजय गवळी यांच्या निलंबनाची कारवाई! (प्रामाणिक पणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याबद्दल सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विद्युत पुरवठा कायमस्वरूपी खंडित दाखविणे व त्याठिकाणी प्रत्यक्षात विद्युत पुरवठा सुरू असल्याचे तपासणीत आढळल्याने पंढरपूर विभागीय कार्यालय महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना निलंबित करण्यात आले आहे. सदरच्या कारवाईतबाबत महाविरण विभागाच्या शिस्तभंग कारवाई कक्ष, मुंबई येथून निलंबन आदेश काढण्यात आला आहे.

महावितरणकडून एकूण थकबाकीबाबत आढावा घेण्यात आला आहे. एकूण कायमस्वरुपी खंडीत केलेल्या ग्राहकांची थकबाकी ४ हजार ७० कोटी इतकी वाढलेली आहे. मागील २ वर्षांमध्ये एकूण १० लाख ३० हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला असून त्यांच्याकडे १ हजार ३५७ कोटी रुपये थकबाकी आहे.कायमस्वरुपी खंडीत केलेल्या पंढरपूर विभागाअंतर्गातील ग्राहकांची तपासणी करण्यात आली. विभागाअंतर्गत ६२ ग्राहकांकडे विद्युत पुरवठा खंडीत केल्याची संगणक प्रणालीत नोंद असल्यानंतरही प्रत्यक्ष जाग्यावर मिटरद्वारे किंवा दुसर्‍या ग्राहक क्रमांकाद्वारे वीज जोडणी दिली असल्याचे आढळले आहे. महावितरणमधील अधिकारी,कर्मचार्‍यांच्या सहभागाशिवाय व मान्यतेशिवाय प्रकरण घडु शकत नसल्याची नोंद करण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here