कार्तिकी वारीत भाविकाला लुटणाऱ्या रिक्षा चालकासह दोघा चोरट्यांना अटक!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कार्तिकी वारीत भाविकाला लुटणाऱ्या रिक्षा चालकासह दोघा चोरट्यांना अटक!

 

कार्तीकी वारीनिमित जनावरांचा बाजार पाहण्यासाठी आलेल्या दोघा भाविकांना मारहाण करून त्यांची रोकड लंपास करणाऱ्या रिक्षा चालकासह दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पंढरपूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शंकर सिताराम भालसिंग रा. वाळखी तालुका व जिल्हा अहमदनगर हे व त्याचे नातेवाकासोबत अकलुज येथुन बुधवार दि २२ रोजी रात्री साडे दहा वाखरी येथे जनावरांचा बाजार पाहण्यासाठी आले होते.

त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी रिक्षा भाड्याने करुन पंढरपुर येथे जात असताना यातील आरोपी रिक्षाचालक व त्याचे साथीदारांनी सदर रिक्षा हि बायपासमार्गे पद्‌मावती तलावाजवळ घेवुन गेले व त्या ठिकाणी रिक्षा थांबवुन अज्ञात रिक्षाचालक व त्याचे साथीदाराने फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन त्याचे जवळील रोख रक्कम रुपये ५८ हजार पाचशे जबरदस्तीने काढुन घेतले.सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तिन आरोपीना अटक करून व गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपुर विभाग पंढरपुर याचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेकडील पौनि शिरीष हुंबे, पोसई मास्ती दिवसे, सपोफौ आप्पासाहेब कर्चे, पोहेकों राहुल शिंदे, पोना गणेश इंगोले व पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील सपोफौ राजेंद्र गोसावि, सपोफौ शरद कदम, पोना प्रसाद आवटी यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मारुती दिवसे करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here