एंकर – कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचे पक्ष पातळीवर आत्मचिंतन करण्यात येईल अशी माहिती वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पंढरपुरात पत्रकाराची बोलताना दिली
मुनगंटीवार आज विठ्ठल दर्शनासाठी आले होते दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कसबा पोट निवडणुकीत झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली.
विजय झाला तर माजायचे नाही आणि हरलो तर लाजायचे नाही. ही आमची शिकवण असल्याने कसब्याच्या परभवाबाबत पक्ष विचार करत आहे. चिंचवडमध्ये अजित पवार यांना लोकांनी नाकारले हे सत्य आहे.
संजय राऊत यांच्या मनाचे मांडे खूप असतात, त्यांना उद्धव साहेब पंतप्रधान होतील असे वाटल होत.. त्यामुळे ते भाजपवर टीका करतात हे त्यांच्या मनाचे खेळ अशी टिका ही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या शिवतीर्थ वरील सभेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यावर न्याय व्यवस्था चांगली आणि इतरवेळी लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात असते. हे चुकीचे आहे. असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.
वन विभागातील कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठिशी न घालता कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.