गार्डी वि.का.सेवा.सोसायटीवर काळे, परिचारक शिवसेना, ङिव्ही.पी. यांचे संयुक्त बहुजन विकास आघाडी पॅनेलचे सर्व विजयी सदस्याचा सत्कार सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे, सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजीराजे शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी गावातील आर.ओ.प्लांट व व्यायाम शाळा या विविध कामाचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, पंचायत समिती सदस्य सत्यवान देवकळे, सहकार शिरोमणीचे संचालक भारत कोळेकर, मा.संचालक दिलीप हिंगमीरे गार्डीचे सरपंच कुमार फाटे, गार्डी वि.का.से.सो. नुतन पदाधिकारी भिंगे सुधाकर भिमाशंकर, चव्हाण प्रल्हाद सिद्राम, गळवे नाथा तोरापा इनामदार विलासराव शंकरराव, जाधव हणमंत शंकर, मोरे मधुकर कोंडीबा, फाटे बिभिषण भगवान, साळूंखे सुनिल दत्तात्रय, गंगनमले सुमन प्रल्हाद, फाटे विमल तानाजी, कांबळे सुधाकर सदाशिव यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येनी उपस्थित होते.