कलाकार सेनेचे स्व.प्रभाकर कदम यांना कलाकार सेनेच्या वतीने श्रद्धांजली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कलाकार सेनेचे स्व.प्रभाकर कदम यांना कलाकार सेनेच्या वतीने श्रद्धांजली

 

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र कामगार सेना प्रणित कलाकार सेनेच्या वतीने बँन्ड वाजक कलाकार स्व . प्रभाकर कदम यांना श्रध्दाजली वाहिण्यात आली .
महाराष्ट्र कामगार सेना प्रणित कलाकार सेनेच्या वतीने स्व . प्रभाकर कदम यांना श्रध्दाजलीपर आयोजित केलेल्या शोक सभेत विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी श्रध्दाजंली वाहतांना म्हणाले की, स्व. प्रभाकर कदम हे स्वतः कलाकार असून इतर कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले . आणि महाराष्ट्र कालाकार सेनेच्या वतीने कलाकारांना न्याय व हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत होते . अशा कलाकारांचा नेता आपल्या मध्ये नाहीसा झाल्याने कलाकारांचे व कलाकार सेनेचे न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे . त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबियांवर दुखःचे ढोंगर कोसळले आहे . कदम यांच्या कुटुंबियांवर आलेल्या संकटात कलाकार सेना पुर्णपणे सहभागी असून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात येईल . असे म्हणून मृत्यु आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून बैठकीत उपस्थित सर्व कलाकार २ मिनिटे शांत राहून स्व . प्रभाकर कदम यांना श्रध्दाजली वाहण्यात आले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोक सभेत गणेश मोरे , सदाशिव सुरवसे , दशरथ नंदाल , विठ्ठल कु-हाडकर , नारायण दणाणे , कुशाल सुरवसे , कैलास गायकवाड , लघु मोरे , भारत देवकुळे , वसंत काळे , विष्णु शेडगे , कल्याण बनसोडे यांच्यासह कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here