कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी सुधाकपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये श्री.डब्लू.आर.आहेर यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक यांचे मार्गदर्शना खाली कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम वेगात सुरु असून गळीत हंगाम 2023-24 वेळेत सुरु करण्यासाठी त्यांचे सुचनेनुसार कामगारांना मार्गदर्शन करणेसाठी साखर कारखानदारीचा अभ्यास असणारे श्री.डब्लु.आर. आहेर यांचे व्याख्यान आयोजीत करणेत आले होते.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुंरग सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने व कामकाजाच्या दृष्टीने मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून त्याद्वारे कामगारांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जातेा. कामगारांनी ऑफ सिझनमध्ये करावयाची कामे व सदर कामाचे नियोजन कशा प्रकारे करावे, कोणत्या वेळी कोणती कामे करावीत, कोणत्या कामांना प्राधान्य दयावे व वेळेचे नियोजन कसे करावे याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकामध्ये कामगारांना समजून सांगितले.

सदर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते म्हणून श्री.डब्लू.आर.आहेर हे लाभले होते. त्यांनी ü कारखान्यामध्ये अनेक वर्षे यशस्वी पणे कामकाज केले असून सध्या ते साखर कारखान्यामध्ये नवनवीन विषयावर व्याख्याने देवून कारखानदारी मध्ये कशाप्रकारे काम केले जावे, व कोणत्या वेळी कोणती कामे करावीत. याबाबत मार्गदर्शन करीत असतात.कामगारांनी दररोज कोणती कामे करावीत, पंधरवाडा वाईज कोणती कामे करावीत करखान्याच्या क्लिनिंगच्या वेळी कोणती कामे करावीत. कारखान्याचा ऑफ सिझनमध्ये कोणती कामे करावीत, याबाबत अत्यंत उत्कृष्टपणे मार्गदर्शन करुन कामगारांना मार्गदर्शन केले. त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कोणती कामे कोणत्या वेळीस करावे याचे ज्ञान मिळाले. त्याचा फायदा कारखान्यास पुढील काळात होणार आहे. कारखान्यामध्ये अगदी बारीक-सारीक गोष्टीही वेळ खाऊ व कष्टाच्या असतात. त्यामधून मार्ग काढण्यासाठी कामगारंानी कोणता मार्गाचा अवलंब करावा यासाठीही मार्गदर्शन मिळाले व्याख्यानसाठी कारखान्यामधील काम करणारे बहुतांशी कामगार, अधिकारी, उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, वर्क मॅनेजर श्री.आर.बी. पाटील ,प्रोडक्शन मॅनेजर श्री. एम.आर.कुलकर्णी, चीफ अकौंटन्ट श्री. आर. एम.काकडे ,केन मॅनेजर श्री. संतोष कुमठेकर ,श्री. एस.पी भालेकर, को-जन मॅनेजर श्री.एस.एस.विभुते, सिव्हील इंजिनिअर श्री.एच.एस .नागणे आदी उपस्थित होते.
डॉ. यशवंतराव कुलकर्णी साहेब
कार्यकारी संचालक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here