कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.साखर कारखाना लि.,श्रीपूर असे झाले नाम विस्तारीकरण (श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे झाले नाम विस्तारीकरण व पार पडला भव्य शेतकरी मेळावा) (पंजाब डख हवामान तज्ञ यांनी सांगितले या दिवशी येणार पाऊस)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे आज नाम विस्तारीकरण झाले. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर असे आज पांडुरंग कारखान्याच्या मेन गेट कमानी वरती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, हवामान तज्ञ पंजाब डख,व्हा. चेअरमन कैलास खुळेसर, इटोपीएन कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते नाम विस्तारीकरण करण्यात आले.
यावेळी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सर्व शेतकऱ्यांना सन 2023 मध्ये येणाऱ्या पावसाचे, गारपिटीचे आणि कोणत्या वेळेला कोणती पिके हवामानानुसार लावावी, याचे अनमोल मार्गदर्शन या शेतकरी मेळाव्यात केले. 6, 7, 8, 15, 16, 17, 18 एप्रिल 2023 रोजी पाऊस येणार असा अंदाज त्यांनी सांगितला. यावेळी शेतकऱ्यांनी साखर उतारा कसा वाढवावा, पिकांना कोणती खते द्यावीत, द्राक्ष पिकाची काळजी कशी घ्यावी, हरभरा, सोयाबीन आदींचे एवरेज कसे काढावे यांचे देखील त्यांनी मार्गदर्शन केले. पाऊस केव्हा व कसा येतो निसर्गात अगोदर कोणते बदल होतात याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील, आदि संचालक, नगरसेवक, स्थानिक मान्यवर, ग्रामस्थ व सर्व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here