पंढरपूर :सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने सर्व पालक हे विद्यार्थ्यांकडे स्पर्धक म्हणून पहात आहेत. त्यामुळे विद्यार्थी मुल्यावार्धतेपासून दूर जाताना दिसत असले तरी विद्यार्थ्यामध्ये मूल्यवर्धन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी सोमवार, दि.०६ जून रोजी केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे मुथ्था फाउंडेशन पुणे व कर्मयोगी फाउंडेशन पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने ‘मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम, आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री नाळे बोलत होते.
यावेळी बोलताना नाळे म्हणाले की, “शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मुल्ये व त्यासंबंधीत कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी वेळोवेळी प्रयत्न करणे गरजेचे आहे”.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रोहनजी परिचारक म्हणाले की, “कोरोना काळात विद्यार्थ्यापर्यंत आपण शिक्षण पोहचविण्यात यशस्वी झालो पण मूल्य रुजविणेही तितकेच महत्वाचे आहे. तसेच लहान मुलांमध्ये संविधानातील मुल्ये रुजविण्यासाठी नगरपरिषद व खाजगी शाळेतील निर्मितीक्षम शिक्षकांसाठी हि तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमावेळी सरस्वती व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रशाषण अधिकारी श्री महेश पवार, संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, कर्मयोगी फाउंडेशन चे श्री.ऋषीकेश उमेश परिचारक, मुथ्था फाउंडेशनचे श्री मयूर कर्जतकर, श्री नानासाहेब खोले, श्री अमोल सायंबर, श्री नागेश बोडके आदी मान्यवर तसेच प्रशालेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ताज्या-घडामोडी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ‘मूल्यवर्धन प्रशिक्षण’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोज ...