कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न”

भरघोस पारितोषिके प्राप्त केली. या विविध स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी पंढरपुरातील नामवंत शाळेचे शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि नामांकित चित्रपट कलाकार श्री. श्रीकांत बडवे-महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते.

या स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या सर्व कलागुणसंपन्न प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी पंढरपुरातील प्रसिद्ध संगीत विद्यावाचस्पती श्री. प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सीमाताई परिचारक या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे समन्वयक श्री. गिरीश खिस्ते यांनी केले तर आभार सारिका बनसोडे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सांस्कृतिक समन्वयक व सौ. वृषाली काळे, सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा.श्री. रोहनजी पारिचारक यांनी सहभागी विद्यार्थी विद्यार्थिंनींचे कौतुक केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here