कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर ची इ. १० वी १००% निकालाची परंपरा कायम!  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शैक्षणिक वर्ष २०२२-२३  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक ०२.०६.२०२३ रोजी जाहीर झाला.
पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा दर वर्षी प्रमाणेच इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला.एकूण 45 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यामध्ये कुमार मयुरेश जाधव 93.60 % गुण मिळवून प्रशालेत सर्वप्रथम,कु.हर्षदा काळे 92.00%  गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर कांचन लिंगे 89.40 % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्रशालेतील एकूण 22 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये तर 18 विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणीमध्ये व 5 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चीफ ट्रस्टी माननीय श्री रोहनजी परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई व संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी केले. तसेच यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील हजर होते.या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here