कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या विद्यार्थ्यास “गणरंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर –येथील लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप.लि.तर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ‘गणरंग स्पर्धा-२०२२’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर प्रशालेतील चि.वेदांत खंडागळे इयत्ता ५ वी या विद्यार्थ्यास जिल्हास्तरीय स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच इतर गटातील ९ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.
या सर्व विद्यार्थ्यांना आज प्रशालेमध्ये प्रशस्तीपत्र व पारितोषिक देवून गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप.लि.चे मॅनेजर श्री राहुल आराध्ये व पंढरपूर शाखाधिकारी श्री सागर राहिरकर आणि अकौंटंट श्री अनंता देवकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या सर्व विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन प्रशालेचे कलाशिक्षक श्री नारायण कुलकर्णी यांचे लाभले.
पारितोषिक प्राप्त उत्तेजनार्थ विद्यार्थी खालीलप्रमाणे,
१. कु.दुर्वा गजानन काशीद २. कु.प्रांजल नीलकंठ काटे ३. चि.साहिल सचिन चव्हाण ४. चि.कामराली इम्रान कमलीवाले ५. श्री.ओंकार समाधान शिंदे ६. कु. प्रगती शीतल खडके ७. कु.साई हनुमंत चव्हाण ८. कु.वैष्णवी श्रीकांत पवार ९. निताशा नितीन धोत्रे
वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा.रोहनजी परिचारक, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here