कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेज शेळवे येथे दिनांक 1 व 2 सप्टेंबर 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी “हाऊ टू गेट रेडी फॉर करिअर” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी यशस्वी झाली असल्याची माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री रोहनजी परिचारक यांनी दिली

सिव्हिल अभियांत्रिकीमधील बांधकाम क्षेत्रात लागणारे सॉफ्टवेअर व त्याची माहिती या दोन दिवसीय कार्यशाळेत देण्यात आली. सिव्हिल विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील नामांकित कंपनीचे ट्रेनर सौ प्रतिभा दीक्षित-वेदपाठक संचालक, क्वॅड स्टेप, पुणे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेस सिव्हिल विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

सदरची कार्यशाळा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. कॉलेजच्या सिव्हिल विभागातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यशाळेला कॉलेजच्या स्थापत्य विभागातील प्राध्यापक व सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त श्री रोहनची परिचारक होते. स्थापत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी भविष्य घडविण्यासाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचे ज्ञान अवगत करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वेळी कॉलेजचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके हेही उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक जे एल मुडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले.

या कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्राध्यापक प्रदीप झांबरे यांनी केले. तसेच ट्रेनरची ओळख कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी पूजा माने यांनी करून दिली. या वेळी कॉलेजचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनीही विचार मांडले. कार्यशाळा पार पाडण्यासाठी आयटी विभागप्रमुख प्राध्यापक दीपक भोसले यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. तसेच स्थापत्य विभागातील सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले व प्राध्यापक प्रदीप झांबरे यांनी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here