कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल १०० टक्के

सोलापूर // प्रतिनिधी

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी हिवाळी परीक्षा २०२१ मध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. महाविद्यालयातील प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० टक्के मार्क मिळवणारे एकूण ४ विद्यार्थी तर ९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेले ४१ विद्यार्थी आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी १०० टक्के आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. 
या संदर्भात बोलताना डॉ. एस पी पाटील म्हणाले की, ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांचे कष्ट व ऑनलाइन लेक्चर, प्रॅक्टिकल्स, ऑनलाइन स्टडी सेशन, टेस्ट सिरीज या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे मिळालेले यश आहे, असे ही त्यांनी संगितले. यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारी पुढीलप्रमाणे: नयनतारा नादाफ (१००%), अक्षता देशमुख (१००%), गणेश कुंभार (१००%), गोपाल बोईनवाड (१००%), ऋतुजा लामकाने (९८.९०%), रोहिणी काटकर (९८.३०%), किरण चव्हाण (९७.५०%), सूरज गायकवाड (९६.७०%), अनुजा शिंदे (९६.१०%), किर्ति नाईकनवरे (९६.१०%), संकेत पाटील (९५%), गणेश सावंत (९३.३०%).
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रा. जे एल मुडेगावकर, प्रा. एन जी तिवारी, प्रा. टी टी मुलाणी, प्रा. ए ए देशमाने, प्रा. एस जे सावेकर, प्रा. डी व्ही  भोसले, प्रा. ए टी बाबर, प्रा. पी. बी झांबरे, प्रा. ए एम सुतार, प्रा. जी एस पंपटवार, प्रा. यु आर कार्वेकर, प्रा. एस एम शिंदे आदि प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले.
संस्थेचे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. एन जी तिवारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here