कर्मयोगीच्या विद्यार्थ्याची मर्सिडिज बेंझ या नामांकित कंपनी मध्ये निवड.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी अभियांत्रिकीची प्लेसमेंटमध्ये आघाडी
 
                               
मर्सिडिज बेंझ या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पद्मसिंह शिंदे या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
मर्सिडिज बेंझ या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून मेकॅनिकल इंजीनीरिंग विभागातील पद्मसिंह शिंदे     या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक ४.५ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. मर्सिडिज बेंझ ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी असून कंपनीचे मुख्य कार्यालय जर्मनी येथे आहे. विद्यार्थी हा च केंद्रबिंदू मानून त्यांना अभियांत्रिकी मधील सखोल तंत्रज्ञान देणे हेच उद्दीष्ट असल्यामुळे कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांची आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होत आहे. पद्मसिंह शिंदे हा विद्यार्थी पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावातील आहे. ग्रामीण भागात असून ही मिळालेले हे यश कर्मयोगी पॅटर्न व महाविद्यालयाने करून घेतलेले कठोर परिश्रम यांचा संयुक्तिक परिणाम आहे असे त्याने आवर्जून संगितले.
 श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. आर जे पांचाळ, प्रा. एस एम शिंदे तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी पद्मसिंहचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here