करकंब येथील कै.विकास भैय्या शहा यांच्या अस्थी पाण्यात विसर्जित न करता शेतात झाडे लावून झाडांच्या बुडात विसर्जित

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

करकंब येथील उद्योजक विकास भाई शहा यांच नुकतच अपघाती दुःखद निधन झाले.घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला,आज तिसरा सावडायचा दिवस असताना त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित न करता त्यांच्या कुटुंबियांनी एक मोठ्या दु:खातून सुध्दा समाजाला नवी दिशा देणारा उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे आपल्या वडिलांच्या अस्थी आपल्या शेतात झाडं लावून त्या अस्थी झाडांच्या बुडात विसर्जित करून कायमस्वरूपी त्यांची आठवण झाडांच्या रुपाने कायम स्मरणात राहील.सध्याच्या युगात नदी प्रदूषणात भयंकर वाढ होत आहे, कारखाना प्रदुषित पाणी सोडल्यामुळे,गुरेढोरे,अस्थी विसर्जन यामुळे नदी प्रदूषित होत असताना अशा उपक्रमामुळे निश्चित नवी दिशा मिळेल आणि प्रत्येकांनी जर असा उपक्रम राबवला तर भविष्यात नक्कीच पर्यावरण आणि स्वच्छतेचे रक्षण होण्यासाठी हातभार लागला जाणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here