करकंब ते नांदोरे-नेवरे पूल या रस्त्याच्या कामाचा आज भूमिपूजन समारंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

करकंब ते नांदोरे-नेवरे पूल या रस्त्याच्या कामाचा आज भूमिपूजन समारंभ

अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर करकंब-नेमतवाडी-पेहे-नांदोरे -नेवरे पूल या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज दि 11 रोजी सायंकाळी चार वाजता मेन कॅनल खारे वस्ती करकंब येथे होणार आहे.

येथील करकंब ते नांदोरे हा माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यामधील रस्ता असून हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेला आहे.या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभ माननीय खासदार श्री रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय आमदार श्री बबनरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार प्रशांतराव परिचारक व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

करकंब ला जोडणारा सहा ते सात खेड्यांचा मुख्य रस्ता व अकलूज-सोलापूर म्हणून या रस्त्याची ओळख होती.मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली होती. त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली माढा विधानसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मिळाला आहे.

या भागातील ग्रामीण जनतेला दळणवळणासाठी आता महत्त्वाचा असलेला रस्ता होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.हा रस्ता बागल इन्फ्रा प्रा लिमिटेड पुणे व श्री सद्गुरु कन्स्ट्रक्शन कंपनी करणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here