करकंबच्या विकासामध्ये मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे मोठे योगदान- ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

करकंबच्या विकासामध्ये मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे मोठे योगदान- ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत

(मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा करकंब येथे सर्वपक्षीय नागरी सत्कार समारंभ संपन्न)

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सुरुवातीपासूनच करकंब ची असलेली नाळ अद्याप तोडलेली नाही. दिलीप बापू धोत्रे यांनी मनसेच्या माध्यमातून यापूर्वी कनकंबा देवी मंदिराचा जीर्णोद्धार बरोबरच 11 संजीवन समाधी स्थळ तसेच शालेय मुलांसाठी जाणे येण्यासाठी रस्ते, कोविड काळात अन्नधान्याच्या स्वरूपात केलेली मदत इतर सामाजिक माध्यमातून दिलीप बापू चे करकंब च्या विकासामध्ये मोठे योगदान असल्याचे मत करकंब ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते ग्रामपंचायत सदस्य राहुल काका पूरवत यांनी व्यक्त केले. ते सर्वपक्षीय आयोजित केलेल्या मनसेचे राज्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पांडुरंग परिवाराचे मारुती अण्णा देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख ग्रामपंचायत सदस्य संतोष धोत्रे, भाजपा तालुकाध्यक्ष युवा मोर्चा लक्ष्मण वंजारी, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख रंजीत कदम, ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे, युवा नेते महेश भैया देशमुख, दलित महासंघाचे नारायण गायकवाड, करकंब क्रिकेट क्लब, आरपीआय पार्टी करकंब, मी वडार महाराष्ट्राचा आदि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, भाजपा युवा मोर्चाचे लक्ष्मण वंजारी, कवी पत्रकार लक्ष्मण जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मनसेच्या नेतेपदी दिलीप बापू धोत्रे यांची निवड झाल्याबद्दल करकंब ग्रामस्थ व सर्वपक्षीय यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संघटना पक्ष पदाधिकारी, पत्रकार यांच्या वतीने ही विशेष सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे शहर विभाग अध्यक्ष गौरव शिंदे, मनसे शहराध्यक्ष संजय गायकवाड, अनुप टेके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here