ओबीसी ना हक्काचं आरक्षण मिळवून देऊ अन्यथा मोठया संख्येनं रस्त्यावर उतरू : भानुदास माळी , प्रदेश अध्यक्ष ओबीसी
सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी ओबीसी चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री भानुदास माळी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर काँग्रेस भवन येथे सोलापूर काँग्रेस शहर जिल्हा कमिटी आणि ओबीसी कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. सदर बैठक ही ओबीसी आरक्षण , ओबीसींचे संघटन आणि भाजप सरकारने मांडलेला ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव ह्या वर मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केले असल्याचं मत काँग्रेस प्रदेश ओबीसीचे सेक्रेटरी श्री सीए सुशील बंदपट्टेनी आपल्या प्रस्तावनेतुन मांडले
बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भानुदास माळी साहेबानी भाजपवर निशाणा साधत भाजप सरकारनेच जाणीव पूर्वक ओबीसींचा इम्पेरिकेल डेटा सर्वोच्च न्यायालय ला दिला नसल्यानं न्यायालयाला ओबीसींचा राजकीय आरक्षण ला स्थगिती द्यावी लागली. ओबीसी आरक्षण हे ओबीसींच्या हक्काचं असून हे आरक्षण कुणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य केलं.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी कमिटी चे अध्यक्षपद स्वीकारल्या नंतर त्यांनी महाराष्ट्र भर दौरा सुरू केला. त्या दौऱ्यातील सोलापूर जिल्हा हा त्यांचा २१ वा जिल्हा असून आपण हे दौरे ओबीसींना संघटित करण्यासाठी करत असल्याचे मत ह्या वेळी त्यांनी मांडले . ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी पक्ष सर्वोतपरी प्रयत्न करेल आणि येणाऱ्या ३ महिन्यात केंद्र सरकारने ओबीसींना न्याय नाही दिला तर महाराष्ट्रातून एक लाख लोक आंदोलन करण्यासाठी दिल्लीला जाऊ असे आश्वासन भानुदास माळी ह्यांनी सांगितलं. शिवाय ओबीसींच संघटन मजबूत करण्यासाठी १८ पगढ जातीतील लोकांचा समावेश करणार असल्याचेही ह्यावेळी भानुदास माळी यांनी सांगितलं.
ह्या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश पाटील , कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी ,मनोज यलगुलवार , माजी महापौर अलका राठोड , महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोलकर , दत्तू बंदपट्टे , फिरदोस पटेल , प्रवीण निखाळजे , अनुराधा काटकर ,भारत जाधव , युवराज जाधव , अशोक कलशेट्टी ,अर्जुन पाटील ,शाहीन शेक , समीर कोळी , तिरुपती परकीपंडला आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते