ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मोहोळ भाजपच्या वतीने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मोहोळ भाजपच्या वतीने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन संपन्न.

सोलापूर // प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजासाठीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर व तालुकाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ,कन्या प्रशाला जवळ येथे नाकर्ते आघाडी राज्य सरकार विरोधात आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले आहे. याविरोधात भाजपच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलनाचं नियोजन करण्यात आले होते. कोर्टाला हवा असलेला इंपेरिकल डाटा राज्य सरकारने दिला नाही तसेच आयोगाची निर्मितीही केली नाही. त्यामुळे हे आरक्षण गेलं. हे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजपा शांत बसणार नाही. वेळप्रसंगी आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी जि. प. अर्थ व बांधकाम सभापती मा. विजयराज डोंगरे, भाजपा नेते संजय क्षीरसागर, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा शंकरराव वाघमारे, भाजपा तालुकाध्यक्ष मा सुनील चव्हाण, माजी पं स सभापती मा. समता गावडे व किसान मोर्चा तालुकाध्यक्ष मा. फंटू गोफने यांनी आपले विचार मांडले. सुरवातीला प्रस्थावनपर भाषण भाजपा नगरसेवक तथा मोहोळ शहर भाजपा प्रभारी मा. सुशिल क्षीरसागर यांनी केले.

यावेळी लिंगराज निकम, बाळासाहेब पवार, पांडुरंग बचुटे, रमेश माने , महेश सोहनी, अनिल वसेकर, पोपट वसेकर, दिलीप गायकवाड, सुनील पाटील, श्रीमती अंजली काटकर,सौ. दीपाली राजेंद्र साठे, हरिभाऊ काकडे,मुजीब मुजावर, शशिकांत गावडे, भारत आवारे, सादिक तांबोळी, नवनाथ गाढवे, दिनेश गडदे,रमेश भानवसे, विशाल डोंगरे, सागर लेंगरे, ज्ञानेश्वर भोसले, अविनाश पांढरे, तुकाराम भानवसे,दीपक पुजारी, महावीर पुजारी, दादासाहेब लांडगे, आनंद गावडे, विकास वाघमारे, संतोष नामदे, जगन्नाथ वसेकर, संजय वाघमोडे, विशाल पवार, सागर वाघमारे, औदूबर वाघमोडे, प्रशांत गाढवे, द्रोणा लेंगरे, सुनील गाढवे, प्रशांत लेंगरे, विठ्ठल पुजारी, रोहित इंगळे आदी सह भाजपा व मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here