एमपीएससीतील ओबीसी आरक्षणाबाबत छावाची उद्या पत्रकार परिषद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एमपीएससीतील ओबीसी आरक्षणाबाबत छावाची उद्या पत्रकार परिषद

सोलापूर // प्रतिनिधी 

एमपीएससी मार्फत घेण्यात येणार्‍या नोकर भरतीतील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण तातडीने रद्द करावे. यासाठी छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी, दि. 12/06/2021 रोजी अॅड. डी.एन.भडंगे यांचेमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
त्या संदर्भात उद्या दि. 14 जुन 2021 रोजी, सकाळी 11:00 वाजता श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर येथे छावाचे योगेश पवार आणि अॅड. डी.एन.भडंगे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. तरी उद्याच्या प्रेस मिटिंगला सोलापुरातील पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे, ही विनंती.
आपलाच – योगेश (दत्ता) पवार.!.YP

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here