ऋषी पंचमी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ऋषी पंचमी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

 

श्री क्षेत्र वरुर जऊळका ता अकोट जी अकोला येथील योग योगेश्वर संस्थान (गजानन महाराज संस्थान)येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या समाधी संजीवन सोहळा च्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये सकाळी काकड आरती, गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मंडळी यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दिनांक ११ सप्टेंबरला श्रींच्या समाधी सोहळ्या निमित्त सकाळी पाच वाजता श्रींचा मूर्तीचा , मुखवट्याचा व पादुकांचा अभिषेक अमोल भाऊ डोयफोडे, विश्वनाथ भाऊ शिरसाट, पुरुषोत्तम भाऊ कात्रे,अवारे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व गजाननविजय ग्रंथाचा काळ स्वाध्याय वाचून ग्रंथ पूजन करण्यात आलेले नेतृत्व रामदास महाराज जवंजाळ ,वैभव महाराज भोसले यांनी सांभाळलेसकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प श्री श्रीधर महाराज अवारे यांच्या काल्याचे किर्तन व सर्व गायक-वादक मंडळींचा सत्कार श्रीधर महाराज पातोंड, श्री रतन पाटील वानखेडे,पींटु भाऊ काठोळे,तुरखडे सर,ऊमराव म केंद्रे, अंबादास पाटील अवारे,कीसना वरहीखर ,कावकार सर पिंटु वानखेडे,बच्चु वानखेडे ,बाळु सोंन्टके,नाना दांदळे यांच्या हस्ते गायक-वादक मंडळींचा सत्कार करण्यात आला दुपारी बारा वाजता श्रींच्या महाआरती नैवेद्य नंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाला गजानन महाराज एरोकर, विलास महाराज कराळ, ज्ञानेश्वर महाराज पातोंड विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे,विष्णु महाराज आवारे,संतोष महाराज घुगे, मनोहर पाटील मोहकारव पंचक्रोशीतील गायक-वादक मंडळींची उपस्थिती लाभली अशी माहिती योग योगेश्वर संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here