ऊस उत्पादक शेतकÅयांच्या विश्वासावर दामाजी कारखान्याचे एक लाख मे।टन ऊस गळीत पूर्ण ऊसाचे वजन कुठेही करुन दामाजीच्या काटयावर खात्री करुन घ्यावी:चेअरमन-श्री शिवानंद यशवंत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ऊस उत्पादक शेतकÅयांच्या विश्वासावर दामाजी कारखान्याचे एक लाख मे।टन ऊस गळीत पूर्ण

ऊसाचे वजन कुठेही करुन दामाजीच्या काटयावर खात्री करुन घ्यावी:चेअरमन-श्री शिवानंद यशवंत पाटील

चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे दि।४/१२/२०२३ अखेर १००९९५ मे।टन गाळप होवुन ९१८०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे। आजचा साखर उतारा १०।११% असुन आजअखेर साखर उतारा ९।२०%मिळाला आहे। कारखान्याची गाळप क्षमता प्रति दिन २५०० मे।टन असताना सध्या दररोज ३५०० ते ३८०० मे।टन गाळप होत आहे। कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु असून ऊस पुरवठादार सभासद शेतकरी यांचे विश्वासाला पात्र राहुन, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार, मजुर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने संचालक मंडळाने ठरविलेले ४।०० लाख मे।टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ निश्चीतच पार करु असा विश्वास चेअरमन श्री।शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला।

पुढे बोलताना ते म्हणाले कि, या हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता रु।२७०१/- प्रमाणे आठ दिवसापुर्वीच ऊस पुरवठादार सभासद शेतकÅयांचे मागणीनुसार बँकां/पतसंस्थामधील शेतकÅयांचे खात्यामध्ये वर्ग केला आहे। ऊस तोडणी वाहतुकीची बिले व कामगार पगार वेळेवर केले आहेत। याशिवाय दामाजी कारखान्यावर कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना ऊस पुरवठा करणाÅया सभासद शेतकÅयांचे विश्वासावर कारखाना पुर्ण क्षमतेने चालु आहे। दामाजी कारखान्याचा वजनकाटा चोख असलेबाबत सोलापुर जिल्हयात नावलौकिक असलेचे सभासद शेतकÅयांमधुन वारंवार बोलले जाते। परंतु या हंगामाचे गळीतासाठी ऊस कमी असुन दामाजी कारखान्यास ऊस गळीतास देण्याचा ऊस उत्पादकांचा कल मोठया प्रमाणावर आहे। असे असताना दामाजीच्या वजनकाटयाबाबत सभासद शेतकÅयामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कांही संधीसाधु करीत आहेत। अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता ऊस उत्पादक शेतकÅयांनी आपला ऊस कोणत्याही काटयावर वजन करुन दामाजीच्या वजन काटयावर आणावा व प्रत्यक्ष वजनाची खात्री करुन घ्यावी। कारखान्यावर येणाÅया ऊसाचे वजन, बाहेर जाणाÅया साखर, मोलासेस, पे्रसमड, तालुक्यातील इतर व्यापाÅयांच्या वाहनांचे वजन एकाच काटयावरुन केले जाते। येणाÅया मालासाठी एक वजनकाटा व जाणाÅया मालासाठी दुसरा वजनकाटा दामाजी कारखान्यावर नाही। हे सुज्ञ ऊस उत्पादक शेतकरी व सभासद जाणुन आहेत। तसेच सर्व सभासद शेतकÅयांनी पिकवलेला ऊस मंगळवेढा तालुक्यात एकमेव सहकारी तत्वावर चालु असलेल्या आपल्या दामाजी कारखान्याचे गळीतासाठी पाठवुन प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे।

 

 

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र।कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here