ऊर्जा भवन बारामती (अ) संघ विजेता तर पंढरपूर विभागास मिळाले उपविजेते पद भारतरत्न डॉ.आंबेडकर स्टेडिअम येथे “महावितरण’ ऊर्जा भवन क्रिडा मंडळ, बारामती तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
महावितरण मधील सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी मागील दोन वर्षातील कोरोना विषाणूच्या  प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये केलेल्या अविरत सेवेमधुन थोडा विरंगुळा मिळावा व कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने बारामती परिमंडल अंतर्गत असलेल्या बारामती मंडल, सातारा मंडल व सोलापूर मंडल या तिन्ही मंडलातील संघ व विभागीय संघ असे एकूण सोळा (16) संघाचे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने शनिवार दि.23 व रविवार 24 एप्रिल 2022  या दोन सुट्टीच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअम बारामती येथे खेळविण्यात आले होते. यामध्ये एकूण सोळा संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी हा ऊर्जा भवन बारामती संघ (अ) व पंढरपूर विभाग या संघामध्ये झाला. यामध्ये ऊर्जा भवन बारामती (अ) संघाने अतिशय चुरशीच्या सामन्यामधे विजय मिळवला असून पंढरपूर विभागास उपविजेते पद प्राप्त झाले आहे. 
सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सदर स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग घेवून सर्व खेळाडूंनी या खेळाचा स्वछंदपणे व ऊत्स्फुर्तरीत्या आंनद घेतला. तसेच या स्पर्धा खेळाडू वृत्तीने खेळ करून आपला उत्तोमोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न सर्व खेळाडूंनी केला. ज्यामधे नॅाकाउट पध्दतिने
1. बारामती ऊर्जा भवन, 2. पंढरपुर विभाग, 3. सासवड विभाग, 4. फलटण विभाग, 5. बारामती विभाग, 6. सोलापूर ग्रामीण विभाग, 7. केडगाव विभाग व 8. बारामती ऊर्जा भवन हे संघ प्रामुख्याने बाद फेरीमधे विजय मिळवुन उपांत्य फेरीसाठी लढले व रविवारी दुसऱ्यादिवशी झालेल्या फायनलचा सामना हा ऊर्जा भवन बारामती संघ (अ) व पंढरपूर विभाग या संघामध्ये झाला. यामध्ये ऊर्जा भवन बारामती (अ) संघाने अतिशय चुरशिच्या सामन्यामधे विजय मिळवला असून पंढरपुर विभागास उपविजेते पद प्राप्त झाले आहे. पंढरपूर विभागाचे नेतृत्व उपव्यवस्थापक दिपक भोसले  यांनी उत्कृष्टपणे केले व संघास उपविजेते पद मिळवून दिले.
या  सर्व क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रसंगी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे साहेब यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे संयोजक  म्हणुन पांडूरंग वेळापूरे, सहा.महा व्यवस्थापक(मासं), श्रीकृष्ण वायदंडे,उप मुख्य औ.सं.आ., तसेच सर्व का.अ. श्री.महाविर शेंडगे, प्रमोद रागीट, म्हसू मिसाळ, विजय सुर्यवंशी, रमेश कांबळे व ईतर अभियंता /अधिकारी वर्ग यांनी या क्रिकेट स्पर्धा यशस्वी रीत्या  पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले.  
या स्पर्धे करिता महाराष्ट्र स्टेट वर्कस फेडरेशन, सबॅाड्रिनेट इंजिनिअर्स असोसिएशन,महाराष्ट्र स्टेट कॉंग्रेस (इंटक), विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व  मागासवर्गीय संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता  देवकाते, सुळ, गोफणे, अ.का.अ. ई. सह सर्व अधिकारी कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शेवटी संयोजन समिती तर्फे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here