उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त् सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर 501 रोपांचेवृक्षारोपन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त् सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर 501 रोपांचेवृक्षारोपन.
सोलापूर // प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेबयांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त्‍त विविध 501 रोपांचे वृक्षारोपन कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे साहेब, व्हा.चेअरमन मा.श्री.राजेंद्र शिंदे साहेब व आजी माजी संचालक यांचे शुभहस्ते करण्यात आले.
प्रत्येकांनी आपला वाढदिवस इतर खर्चाला फाटा देवून, आलेल्या पाहुण्यांना, मित्र-मैत्रीनींना एक रोप भेट देवुन वाढदिवस साजरा करुन, निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी  यावेळी केले. वाढते औद्योगिकरण, त्यापासून निर्माण होणारे प्रदुषण यामुळे निसर्गाचा समतोड बिघडत चालला असून, त्याचा आरोग्यावर व शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. सध्याच्या तरुणपिढीनी विविध्‍ प्रकारचे रोप लावून ती जोपासण्याचा छंद लागण्यासाठी जनजागृती करण्याची काळाची गरज असल्याचेही यावेळी श्री.काळे यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, राजाराम पाटील, विलास जगदाळे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, माजी संचालक महादेव देठे, प्रताप म्हेत्रे, यशवंत सहकारी पतसंस्थेचे नुतन चेअरमन शहाजी साळुंखे, इतर मान्यवर व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here