उद्योग व व्यापार विभागाच्या राज्यप्रमुखपदी नागेश फाटे यांची नियुक्ती!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्योग व व्यापार विभागाच्या राज्यप्रमुखपदी नागेश फाटे यांची नियुक्ती!

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या राज्यप्रमुखपदी श्री. नागेश एकनाथ फाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते नागेश फाटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून राज्यात व्यापारी पक्ष बळकटीसाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नागेश फाटे यांचे सहकार्य राहील असा विश्वास ना.जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार विभागाच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती केली आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे व पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडेल असे मत उद्योग व व्यापार राज्यप्रमुख नागेश फाटे यांनी व्यक्त केले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here